ध्येय – उद्दिष्ट्ये

ध्येय - उद्दिष्ट्ये


ANF ध्येय

अरुण नरके फौंडेशनच्या स्थापने समयीचे बोधचिन्ह मा. विश्वस्त सौ. स्निग्धा नरके यांनी नव्याने सर्व उद्दिष्ट्ये स्पष्ट व्हावी या हेतूने पूर्वस्थापित केले. तसेच मानवता हिताय तप्तरम हे ब्रीद वाक्य मा. महासंचालक डॉ. श्रीकांत बनकर यांनी निर्माण करून मानवी हिताच्या प्रत्येक आघाडीवर तत्परतेने दीर्घकाळ टिकणारे, रचनात्मक असे कार्य उभे करण्याचे व त्याद्वारे समाजाचे जीवनमान उंचावण्याचे ध्येय संस्थेने उराशी बाळगले आहे याची ग्वाही दिली.




ANF उद्दिष्ट्ये

संस्थेच्या ध्येयाकडे नेणाऱ्या व सध्या चालू असणाऱ्या तसेच नजीकच्या भविष्यात सुरू होणाऱ्या कार्य स्वरूपात संस्थेने आपली उद्दिष्ट्ये निर्धारित केली आहेत. शिक्षण, कृषी, सहकार, ग्रामविकास, कला, क्रिडा, आरोग्य, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय-मत्स्यव्यवसाय विकास, शहरी विकास, महिला व बालकल्याण, अपंगकल्याण व पुनर्वसन, सामाजिक न्याय, पर्यावरण, साहित्य-भाषा व सांस्कृतिक कार्य, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, कामगार कल्याण, अल्पसंख्यांक विकास, कौशल्यविकास व उद्योजकता, विधी व न्याय, नियोजन आदिवासी व भटके-विमुक्त विकास माहिती तंत्रज्ञान व विदा, माध्यम या विभागांच्या प्रस्थापनेद्वारे प्रत्येक विभागात मूलभूत, रचनात्मक, संशोधनात्मक शिक्षण -प्रशिक्षणात्मक व प्रबोधनात्मक असे कृतिशील कार्य निर्माण करणे.