Testimonials

आज माझी कनिष्ठ लेखापरीक्षक आणि लेखालिपीक अशा दोन पदांसाठी एकाचवेळी निवड झाली, आणि या यशामध्ये मला मौल्यवान असे अरुण नरके फौंडेशन यांचे सहकार्य लाभले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की हे यास नरके फौंडेशनच्या सर्व स्टाफमुळे मिळाले त्याबद्दल मी त्यांचा शतशः आभारी राहीन.

सुशांत सुरेश माळवी (कनिष्ठ लेखापरीक्षक आणि लेखालिपीक)

मु. पो. गुडाळ, ता. राधानगरी, कोल्हापूर.

अरुण नरके फौंडेशनचे प्रथमतः खूप आभार एक सामान्य मुलगा अधिकार होऊ शकतो हा त्यांनी दिलेला विश्वास. प्रत्येक स्टाफ मेंबरने ज्याज्या वेळी मदत लागेल तेव्हा खूप मदत केली. या प्रवासात आईवडीलांनी मोलाची साथ दिली. अपयशाने खचून न जाता त्यावर मात कशी करावी हे त्यांनी शिकवले. नरके फौंडेशनने दिलेला कानमंत्र म्हणजे, "जेव्हा अपयश येते तेव्हा समजून जा अजून तू ऐरण आहेस, घाव सोस ... आणि जेव्हा हातोडा होशील तेव्हा घाव घाल! ...' " स्पर्धा परीक्षेचा हा प्रवास खूप काही शिकवून गेला... मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल अरुण नरके फौंडेशने खूप खूप आभार!

विवेक पांडुरंग जाधव (जलसंधारण अधिकारी (गट-ब))

मु. पो. चिंचवाड, कोल्हापूर.

२०१७ पासुन एम.पी.एस.सी. चा अभ्यास करायला सुरूवात केली. आणि पहिलीच परीक्षा पास होऊन मी PSI झाले. प्रवास खडतर होता. पण अरुण नरके फौंडेशनच्या मदतीने तो पार करायला मदतच झाली. सर्व सरांनी खूप आत्मविश्वास दिला. मुलाखत उत्तमरित्या घेतली. त्यामुळे याचा आयोगाच्या मुलाखतीवेळी चांगला परिणाम झाला देऊ शकले. त्यामुळे मी सर्वांची ऋणी राहीन. धन्यवाद!

भाग्यश्री बाळू कांबळे (PSI)

मु.पो. बाचणी, ता. करवीर, कोल्हापूर.

माझा हा पहिलाच प्रयत्न होता. आई-वडीलांचा आशिर्वाद अथक परिश्रम आणि नियोजनरीत्या अभ्यास ही यशाची त्रिसुत्री अरुण नरके फौंडेशनच्या माध्यमातुन गवसली. मुलाखतीसाठी विशेष सहकार्य केल्यामुळे हे यश खुपच सोप्पे झाले. मला लाभलेल्या या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल मी अरूण नरके फौंडेशनचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद!

सुरज उदय पाटील (Specialist officer (Agriculture field officer) Bank of India)

रा. गुडाळ,ता. राधानगरी, कोल्हापूर.

माझ्या आईवडीलांचा पाठिंबा, भावाची सोबत आणि नरके फौंडेशनचं मोलाचं असं मार्गदर्शन यामुळेच मी माझ्या या यशाला गवसणी घालू शकले. यासाठी बरोबर दोन वर्षाचं माझं अथक परिश्रम अरुण नरके फौंडेशनच्या सर्व शिक्षकांचा मार्गदर्शनाची खुप मदत झाली आणि त्यामुळेच बरोबर दीड वर्षाच्या अभ्यासातुन दोन पोस्ट काढू शकले. मला मिळालेल्या मोलाच्या अशा मार्गदर्शनाबद्दल मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद!

प्रियांका रंगराव तावडे (BOI Clerk)

राशिवडे खुर्द (बेले), कोल्हापूर.

सर्वप्रथम अरुण नरके फौंडेशनचे आभार मानतो. माझ्या आईवडीलाप्रमाणेच मला घडविण्यात अरुण नरके फौंडेशनचा खूप मोठा वाटा आहे. फौंडेशनमधील शिक्षकांकडून मला मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळे मी यशाला गवसणी घालू शकलो त्याबद्दल मी अरुण नरके फौंडेशनचे मनापासून आभार मानतो.

संदीप कुडलीक सावंत (मुंबई उच्च न्यायालय, शिपाई)

'आमशी, कोल्हापूर.

सर्वप्रथम मी अरुण नरके फौंडेशनचे मनापासून आभार मानते. मी नरके फौंडेशनमध्ये २०१७ ला बँकिंगची IBPS P.O. च्या बॅचला अॅडमिशन घेतल होते. या क्लासचा मला खूप फायदा झाला. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफने मला येथे शिक्षण घेण्यात तसेच Study Room मध्ये Study करण्यात खूपच मदत केली. त्यामुळे मी इथे खूप Comfortable Study करू शकले. तसेच आज जे यश मला मिळाले त्यात माझ्या आई-वडीलांच्या सोबतच अरुण नरके फौंडेशनचाही मोलाचा वाटा आहे. शेवटची फक्त एवढच म्हणेन Thank you so much for everything.

प्रणाली संजय पाटील (महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळ, क्लार्क)

आवळी खुर्द, ता. राधानगरी, कोल्हापूर.

स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासाबरोबर मुलाखतीची तयारी महत्वाची असते त्याची परिपुर्ण तयारी अरुण नरके फौंडेशनमध्ये करून घेण्यात आली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. अरुण नरके फौंडेशन अभ्यासासाठी परिपुर्ण असे फौंडेशन आहे. तरी विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करिअर घडवण्यासाठी करावा.

अमोल जगन्नाथ पाटील (PSI)

वाळवा, सांगली.

माझ्या एम.पी.एस.सी.च्या वाटचालीमध्ये अरुण नरके फौंडेशनचा मोलाचा वाटा आहे. विशेषतः गरीब कुटुंबातील मुलांना माफक फी मध्ये योग्य मार्गदर्शन देण्याचे काम फौंडेशन करत आहे. त्या बद्दल विशेष आभार. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांकडून आमच्या मुलाखती झाल्या व त्याचा मला जास्त फायदा झाला.

दीपक आनंदा माने (PSI)

कुशिरे, पन्हाळा, कोल्हापूर.

गडचिरोलीमध्ये सलग ३ वर्षे PSI म्हणून सेवा केली. गडचिरोलीहा जिल्हा नक्षलप्रभावी असल्याने , तिथे केलेल्या कामगिरीमुळे मला पोलिस महासंचालक व राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले. हे यश मला PSI म्हणून निवड झाल्यानेच मिळाले , त्यामुळे मी अरुण नरके फौंडेशनचा खूप आभारी आहे..  

श्री.शितलकुमार अनिल डोईजड

PSI (गडचिरोली)

सरकारी नोकरीचे स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते सत्यात आणण्याचे काम फक्त अरुण नरके फौंडेशनमुळेच शक्य झाले. केवळ फौंडेशनमुळेच आज मी सन्मानाने जगू शकते.फौंडेशनचे अचूक मार्गदर्शन , टेस्ट सिरीज आणि माझा आत्मविश्वास यामुळेच मला हे यश संपादन करता आले. ग्रामीण भागातील मुलांसाठी तर हि संस्था दिपस्तंभासारखी आहे.

रेश्मा मधुकर पोटे

नोंदणी कार्यालय क्लार्क - कोल्हापूर

ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळी स्पर्धा परीक्षेचा कोणताही अनुभव नव्हता मात्र अरुण नरके फौंडेशनचे क्लास लेक्चर व सराव टेस्टमुळे नेमका कोणता अभ्यास करावा याची माहिती मिळाली.फौंडेशनचा सर्व स्टाफ, स्टडी रूम, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले.

उत्तम पाटील.

कृषी सेवक

नोकरी आणि सपर्धा परीक्षा यांचा काहीही माहिती नसताना, मी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचे ठरविले.कशी सुरवात करावी हेच काळत नव्हते.पण सुरवात करून दिली अरुण नरके फौंडेशन गडहिंग्लज शाखेने आणि तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने माझी पहिल्याच प्रयत्नात पोलीस मध्ये निवड झाली.  

रणजित महादेव पाटील (माझी सैनिक)

पुणे पोलीस

आम्हा शेतकऱ्यांच्या मुलींना अधिकारी होण्याची स्वप्न साकार करण्याचे अरुण नरके फौंडेशनने सिंहाचा वाटा उचलला आहे.फौंडेशनचे शतशः आभार.अधिकारी होण्याची स्वप्न कोणत्याही वयात साकार होऊ शकते ते फौंडेशनमध्ये आल्यानंतर कळले व मेहनत करण्याचे बळ मिळाले.फौंडेशनच्या सहकार्यास अभिवादन !

सौ. राणीताई शिवाजीराव पाटील

अधिव्याखता

घरची परिस्तिथी नसताना पण मी जॉब करत स्टडी केला.जस माझ्या कुटूंबाने मला आत्तापर्यंत मदत केली तस अरुण नरके फौंडेशन हे माझं दुसरं कुटूंब होत.या कुटूंबातील प्रत्येक सदस्याने मला मदत केली आहे.त्यामुळेच मी या पदापर्यंत पोहचलो.  

प्रमोद पाटील

PSI