Check your Query

1• MPSC स्पर्धा परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते ?
पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात.
2MPSC स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वयाची अट काय असते ?
खुल्या वर्गासाठी १९ ते ३८ व्या वर्षापर्यंत , तसेच अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांसाठी वयाच्या ४३ व्या वर्षापर्यंत या परीक्षा देता येतात ,तसेच अपंगासाठी १० वर्षे , माजी सैनिक ,खेळाडू यांच्यासाठी ५ वर्षांची सवलत असते.
3MPSC आयोगामार्फत कोणकोणत्या परीक्षा घेण्यात येतात ?
MPSC आयोगामार्फत – राज्यसेवा परीक्षा, गट ‘ब’(PSI/STI/ASO) संयुक्त परीक्षा, गट ‘क’ (Ex.PSI/Tax Assistant/Clerk) संयुक्त परीक्षा, RTO,वन विभाग , न्यायालयीन विभाग, अभियांत्रिकी सेवा परीक्षा इ.परीक्षा घेण्यात येतात.
4MPSC परीक्षेचे स्वरूप कसे असते ?
MPSC सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात, काही ठराविक परीक्षांसाठीच मुलाखत असते. प्रश्न पत्रिकेचे स्वरूप वस्तूनिष्ठ बहुपर्यायी असतात. निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते, या परीक्षा ऑफलाईन पध्दतीने घेतल्या जातात.
5कोणत्या भाषेतून MPSC परीक्षा देता येतात ?
MPSC च्या परीक्षा मराठी व इंग्रजी माध्यमातून देता येतात.
6MPSC परीक्षांसाठी अभ्यासक्रम काय असतो?
सर्वसाधारणपणे ५ वी ते १२ वी,पदवी पर्यंतचा अभ्यासक्रम असतो, विविध पदांच्या परीक्षांनुसार प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी कमी अधिक असते.
7Banking स्पर्धा परीक्षा देण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय असावी लागते ?
पदवी किंवा पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेला बसलेले कोणत्याही शाखेचे विद्यार्थी या परीक्षा देऊ शकतात.
8Banking स्पर्धा परीक्षा देण्यासाठी वयाची अट काय असते ?
खुल्या वर्गासाठी Clerk साठी १८ ते २८ व्या वर्षापर्यंत, PO साठी १८ ते ३० व्या वर्षापर्यंत, तसेच अनुसूचित जाती, जमाती साठी ५ वर्षे सवलत व इतर मागासवर्गीयांसाठी ३ वर्षे सवलत, तसेच अपंगासाठी १० वर्षे , माजी सैनिक यांच्यासाठी ५ वर्षांची सवलत असते.
9IBPS/SBI अंतर्गत कोणकोणत्या परीक्षा घेण्यात येतात ?
IBPS/SBI अंतर्गत Clerk, PO, SO साठी परीक्षा घेण्यात येतात.
10IBPS/SBI च्या परीक्षांचे स्वरूप कसे असते ?
IBPS/SBI च्या सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा व मुलाखत या टप्प्यात परीक्षा घेतल्या जातात, काही ठराविक परीक्षांसाठीच मुलाखत असते. प्रश्न पत्रिकेचे स्वरूप वस्तूनिष्ठ बहुपर्यायी असतात. निगेटिव्ह मार्किंग पद्धत असते, या परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जातात.
11कोणत्या भाषेतून Banking परीक्षा देता येतात ?
Banking च्या परीक्षा सध्या इंग्रजी व हिंदी माध्यमातून देता येतात पण शासनाच्या नवीन आदेशानुसार प्रादेशिक भाषांमधून या परीक्षा देता येणार आहेत.
12Banking परीक्षांसाठी अभ्यासक्रम काय असतो?
Banking परीक्षांसाठी Math’s, Reasoning, English, GA व Computer हा अभ्यासक्रम असतो, विविध पदांच्या परीक्षांनुसार प्रश्नपत्रिकांची काठीण्य पातळी कमी अधिक असते.
13Banking परीक्षां बरोबरच कोणकोणत्या परीक्षा देता येतात ?
Banking परीक्षांच्या अभ्यासक्रमाच्या तयारीसोबत IBPS / SBI / RRB / RBI / SSC / RAILWAY / LIC /MSEDCL / POST या विभागांतर्गत Clerk, PO, SO, Assistant, Multitasking Staff etc. अश्या विविध पदांच्या परीक्षांची अप्रत्यक्षरीत्या तयारी होते.