भविष्यातील उपक्रम

सामाजिक व स्पर्धापरीक्षां क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमातून अरुण नरके फौंडेशन गेली २७ वर्षे अखंडीतपणे सामाजिक कार्य करत आहे, परंतु बदलत्या काळानुसार आणि बदलत्या परिस्थितीनुसार या वटवृक्षाच्या विस्तारासाठी पुणे-मुंबईसह देश-विदेशात विविध विभागातून विस्तार होणे अत्यंत आवश्यक आहे,म्हणूनच संस्था खालील भागात उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहे.

अरुण नरके फौंडेशनने संस्थेची उद्दिष्टे लक्षात घेऊन भविष्यातील उपक्रमांची विभागीय योजना तयार केली आहे, या योजनेनुसार भविष्यातील उपक्रमांचे नियोजन केले आहे,या लोककल्याणकारी उपक्रमांचा सारांश खालीलप्रमाणे आहे -

शिक्षण

ग्रामीण तरुणांना प्रशासनात सामावून घेण्याच्या उद्देशाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय २७ वर्षांपूर्वी फौंडेशनच्या संस्थापकांनी घेतला होता. या केंद्राचा ग्रामीण भागातील तरुणांना खूप फायदा झाला आहे. आजपर्यंत शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील 4650 हून अधिक विद्यार्थ्यांची प्रशासकीय सेवेत निवड झाली आहे, फौंडेशनने हे काम महाराष्ट्रातील ग्रामीण आणि निमशहरी भागात विस्तारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात अंगणवाड्या सक्षम करण्यासाठी आमचा बालवाडी प्रकल्प शहरी झोपडपट्ट्यांमध्ये पुन्हा सुरू करणे, दहावी-बारावीनंतर वैज्ञानिक करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन देणे, विविध क्षेत्रात संशोधन करणे, स्थानिक आणि परदेशी विद्यापीठांच्या भागीदारीत संशोधन, उद्योजकता आणि कौशल्य विकासास प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर फौंडेशनने अल्पकालीन कौशल्यावर आधारीत प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास प्रयत्शील आहे.


कला

विविध कलांच्या वाढ आणि संवर्धनासाठी कला प्रदर्शनांचे आयोजन करणे, कला क्षेत्रात उदयोन्मुख कलाकारांना सन्मानित करणे आणि प्रोत्साहित करणे.


क्रिडा

कुस्ती, फुटबॉल, कबड्डी, इ.चे सामने भरविणे, गुणवंत खेळाडूंचा सन्मान करणे, खेळाडूंना वैज्ञानिक पद्धतीने प्रशिक्षण देणे.


कृषी, पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विकास

पशुपालकांच्या आधुनिक अधिक उत्पादक पद्धतींवर पशुपालकांना शिक्षण देणे, यासंदर्भात सुविधा पुरवणे, दुग्ध व्यवसायात आधुनिक आणि उत्पादक उपक्रम राबविणे, तरुणांना मत्स्यपालनाबद्दल शिक्षित करणे आणि इतर आर्थिक मदत देणे, शेतीपूरक व्यवसायांची निर्मिती करण्यास संस्था प्रयत्शील आहे.


कौशल्य विकास

तरुणांना विविध कौशल्यावर आधारीत उपक्रमांचे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती करणे.


महिला सबलीकरण

महिला सबलीकरण अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना विविध कौशल्यावर आधारीत उपक्रमांचे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती व उद्योजक निर्माण करणे, तसेच आरोग्य, स्व:संरक्षण, महिलांचे कायदे, समुपदेशन याविषयी उपक्रम व जनजागृती करणे.