ध्येय आणि उद्दिष्टे


संस्थेचे ध्येय :

संस्थेने मानवी हितसंबंधांच्या प्रत्येक आघाडीवर दीर्घकालीन, विधायक कार्य निर्माण करण्याचे आणि त्याद्वारे सामाजिक जीवनमान उंचावण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
संस्थेची उद्दिष्टे :

संस्थेने आपले उद्दिष्ट संस्थेच्या ध्येयांच्या दिशेने चालू असलेल्या कार्याच्या रूपात निश्चित केले आहे. शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार, ग्रामीण विकास,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, शहरी विकास, महिला आणि बालकल्याण, अपंगत्व आणि पुनर्वसन, सामाजिक न्याय, पर्यावरण, साहित्य, भाषा आणि सांस्कृतिक व्यवहार, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार कल्याण, अल्पसंख्याक विकास, कौशल्य विकास आणि उद्योजकता, कायदा आणि न्याय, नियोजन, आदिवासी विकास, माहिती तंत्रज्ञान,मीडिया या क्षेत्रात कार्य करण्याचे ठरविले आहे.
ANF मिशन

अरुण नरके फौंडेशन(NGO) समाजातील वंचित घटकांना ,गरीब व होतकरू तरुणांना बदलत्या जगात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणे, त्यांना तयार करणे आणि सशक्त करणे.
याचा अर्थ:
  • प्रत्येक तरुणांची क्षमता शोधण्यासाठी,क्षमता समजून घेण्यास, क्षमता ओळखण्यास आणि त्याचे दृष्टीकोन विस्तृत करण्यास मदत करणे.
  • विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक विकास करून,एक परीपूर्ण व्यक्ती म्हणून विकास होण्यासाठी प्रेरित करणे.
  • विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी प्रेरणा देणे.
  • विद्यार्थ्यांना बदलत्या जगात जुळवून घेण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि क्षमता विकसित करण्यास मदत करून त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी तयार करणे.
  • संस्थेच्या परिपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थी सक्षम आत्मविश्वास प्राप्त करू शकतील असे वातावरण तयार करणे.

ANF व्हिजन

शिक्षण व इतर सामाजिक उपक्रमातून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी कायम अग्रेसर राहणे.
याचा अर्थ:
  • संस्थेच्या विविध विभागातील लाभार्थी यांना सकारात्मक प्रभाव बळकट करण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सातत्याने विविध सामाजिक उपक्रमातून प्रयत्न करणे.
  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नामांकीत संस्था (NGO) म्हणून संस्थेची ओळख निर्माण करणे.
  • सतत नाविन्यपूर्ण व सामाजिक हिताचे रोजगारविषयक उपक्रम राबवून सर्वसामान्यांना रोजगार उपलब्द करून देणे.