सामाजिक योगदान
अरुण नरके फौंडेशन ची नाळच समाजाशी जोडलेली असून समाजसेवेच व्रत गेली २७ वर्षे अखंड अविरतपणे सुरु आहे. केवळ अर्थाजनांचा हेतू बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने, सेवाभावी वृत्तीने समृद्ध भारत घडविण्यासाठी दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमातून अखंडपणे सामाजिक कार्य करत आहे. ज्याचा समाजातील सर्वच स्तरातील लोकांना निश्चितपणे फायदा होतो. भविष्यात सामाजिक बांधिलकीची जाणीव तरुण विद्यार्थ्यांना व्हावी व त्यांच्याकडून ही समाजसेवा, देशसेवा व्हावी या हेतूने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.
रक्तदान शिबीर -
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. ज्यामुळे कित्येक लोकांचे प्राण वाचवले जाऊ शकतात. सद्य स्थितीत आवश्यक असणारा रक्तसाठा व रक्तदान करणारे रक्तदाते खूपच कमी असल्यामुळे रक्ताचा तुटवडा नेहमी भासतो यासाठी प्रामाणिक प्रयत्न संस्था दरवर्षी करते.
स्वच्छता अभियान -
मा. पंतप्रधानांनी केलेल्या स्वच्छ भारत अभियानास देशभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत होता. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता अभियान राबविले गेले. सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये प्रत्यक्ष स्वच्छता व प्रभातफेरी काढून स्वच्छतेबाबत लोकांना जागृत केले.
अंध यूवा मंच, हणबरवाडी -
अंध यूवा मंच, हणबरवाडी येथील अंध मुलांच्या निवासी शाळेला जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्य वाटप.
शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्या -
शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम वाड्या-वस्त्यामध्ये शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य, कपडे, खाऊ वाटप.
करूणालय
‘करूणालय’ या शिये, कोल्हापूर येथील एच.आय.व्ही पॉझिटिव्ह मुलांच्या निवासी संस्थेला बेडशीट व खाऊ वाटप केले.
एकटी
‘एकटी’ या निराधार महिला व पुरुषांना राहण्या व जेवणाची व्यवस्था करणाऱ्या समाजसेवी संस्थेला ताटे व कपडे वाटप केले.
अवनि
‘अवनि’ या निराधार निराश्रीत मुलांसाठी काम करणाऱ्या समाजसेवी संस्थेला संगणक टेबल, भांडी भेट व तेथील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तीमत्व विकास शिबिर राबवण्यात आले.
महिला सबलीकरण व जनजागृतीसाठी
महिला सबलीकरण व जनजागृतीसाठी शहरातील न्यू कॉलेज, मिरजकर तिकटी, बिंदू चौक अशा गर्दीच्या ठिकाणी पथनाट्य व युवती स्वसंरक्षण शिबिरांचे आयोजन केले.
सर्वांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीर
सर्वांसाठी मोफत डोळे तपासणी शिबीर, दंत चिकित्सा शिबीर, मानसशास्त्रीय समुपदेशन ज्यामुळे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी व परिसरातील वृद्ध व नागरीक या सर्वांना फायदा झाला.
वृद्धाश्रमांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप
वृद्धाश्रमांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप: कोल्हापूरातील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील वृद्धांसोबत गप्पा मारुन त्यांचा एकाकीपणा घालवण्याचा प्रयत्न करून आनंदी वातावरण तयार केले. कविता, गाणी, नक्कल आदी सादर करुन त्यांचे मनोरंजन केले तसेच त्यांना फळे, धान्य व जेवण बनवण्यासाठी मोठी भांडी भेट स्वरूपात दिली.
शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके -
कोल्हापूरातील राजर्षी शाहू स्मृती उद्यानात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन, मर्दानी खेळ, पोवाडे सादरीकरण केले याचा फायदा परीसरातील नागरीकांना मोठ्या प्रमाणात झाला. शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
पूरग्रस्तांना मदत -
ऑगस्ट २०१९ मध्ये संपूर्ण कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार माजवला होता. अनेक लोक मृत्युमुखी पडले, जिवीत व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली होती. रस्ते व वाहतुक पूर्णपणे बंद झाली होती जनसंपर्क तुटला होता व लोकांना मदत करणे गरजेचे होते. ही गरज ओळखून गोटे ता. पन्हाळा येथील पूरग्रस्तांना मदत करण्यात आली ज्यामध्ये सर्व प्रकारच्या जिवनावश्यक वस्तुंचे किट करून ते गरजूंना वाटण्यात आले तसेच बरेच विद्यार्थी महापुरामुळे घरी जाऊ शकले नाहीत व खानावळी बंद असल्यामुळे त्यांच्या जेवणाचा प्रश्न गंभीर बनला होता अशावेळी सर्व गरजू विद्यार्थ्यांना सकाळ-संध्याकाळ फुड पॅकेट वाटण्यात आली.
वृक्षारोपण -
संस्थापक मा. श्री. अरुण नरकेसो, अध्यक्ष मा. चेतन नरकेसो व सर्व गोकुळ दूध संघाच्या मान्यवरांच्या उपस्थितीत गोकुळ शिरगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले.
(COVID-19) प्रतिबंधात्मक उपक्रम -
मार्च २०२० मध्ये संपूर्ण जगभरात, भारत व मुख्यता महाराष्ट्रात उद्भवलेल्या कोरोना (COVID-19) व्हायरस मुळे सर्वत्र टाळेबंदी व कलम १४४ लागू केल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या दळणवळणावर प्रतिबंध करण्यात आल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष मा. चेतन नरके सर यांच्या मार्गदर्शनाने प्रशासकीय यंत्रणेला मदत व्हावी म्हणून कोरोना (COVID-19) महामारी या साथीच्या रोगाच्या प्रतिबंधासाठी लॉकडाऊनच्या काळात शासनासमवेत जिल्हापरिषद, CPR हॉस्पिटल, कोल्हापूर महानगरपालिका यांच्यासोबत केलेली कामे पुढीलप्रमाणे...