अध्यक्षीय मनोगत : (President Message)


उज्ज्वल राष्ट्र निर्मितीसाठी त्यागाची, संस्कारांची आणि शौर्यवंतांची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या राजर्षी शाहूंच्या भुमीत १९९४ साली ‘अरूण नरके फौंडेशन’(NGO)या न्यासाचा शुभारंभ झाला.आजमितिस राजर्षी शाहूंच्या करवीर नगरीतील या फौंडेशनमध्ये स्पर्धापरीक्षा विभागातून सामान्य शेतकरी कुटुंबातील, शहरी व ग्रामीण भागातील ४६५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न साकारले आहे, तसेच फौंडेशनच्या विविध सामाजिक व शैक्षणिक सेवेतून आजपर्यंत ७,००,००० (सात लाख) हून अधिक लाभार्थानी लाभ घेतला आहे, हे फौंडेशनच्या सेवाकार्याचे साफल्य आहे असे मनापासून वाटते, संस्थेकडून अप्रत्यक्षरित्या देशसेवेचे कार्य घडते याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.

केवळ अर्थाजनांचा हेतू बाजूला ठेऊन सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेने, सेवाभावी वृतीने समृद्ध भारत घडविण्यासाठी व्यसनमुक्ती अभियान, रक्तदान शिबिर, गडकोट किल्ले संवर्धन, स्वच्छता अभियान, बालवाडी प्रकल्प, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाड्या वस्तीतील मुलांना शालेय साहित्यांचे वाटप, HIV पॉझिटिव्ह, निराधार महिला,तृतीय पंथी, पूरग्रस्त व वृद्धाश्रमांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, मोफत आरोग्य तपासणी, मानसशास्त्रीय समुपदेशन, महिला सबलीकरण अंतर्गत युवती स्व-संरक्षण शिबिर, जनजागृती पथनाट्य, वृक्षारोपण तसेच कोविड-19 प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर शासनासमवेत ग्रामीण भागातील जनतेला मास्क , सॅनिटायझर,जीवनाआवश्यक वस्तूं , इम्युनिटी बुस्टरचे वाटप तसेच पोलीस दलातील बांधवाना मोफत मास्क व हॅन्डग्लोज वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमातून अरुण नरके फौंडेशन गेली २७ वर्षे अखंडीतपणे सामाजिक कार्य करत आहे.

शिक्षण हे सर्वात शक्तिशाली साधन आहे ज्याद्वारे जग बदलता येते, माझा विश्वास आहे की या राष्ट्राचे भविष्य भारताच्या तरुणांच्या हातात आहे, युवकांनी शिक्षणाद्वारे सक्षमीकरण केले तरच हे साध्य होऊ शकते, यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यात आणि विशेषत: ग्रामीण भागापर्यंत शैक्षणिक सुविधा पोहोचल्या तरच समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो,यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थांची अधिकारी होण्याची स्वप्ने साकार करण्यासाठी स्पर्धापरीक्षां विभागांतर्गत मार्गदर्शन, युवकांमधील स्पर्धापरीक्षा व रोजगारविषयक जनजागृती निर्माण करणे, शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न वाढविण्यासाठी विविध शेतीपूरक व्यवसायांचे मार्गदर्शन करणे,कला,क्रिडा क्षेत्रातील होतकरूंना हातभार देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे, महिला सबलीकरण अंतर्गत विविध उपक्रम, प्रशिक्षण राबवून त्यांना सक्षम बनवून रोजगार निर्मिती करून आर्थिक हातभार लावणे, असे विविध समाजपयोगी उपक्रम राबवून सर्वसामान्यांचा सामाजिक उपक्रम राबविण्यास संस्था प्रयत्शील आहे.

आजच्या समाजात शिक्षण, कला, क्रिडा, कौशल्य विकास, कृषी, महिला सबलीकरण, रोजगार निर्मिती अश्या विभागातून बरीच सामाजिक कार्ये करायची आहेत. सामाजिक शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंत आणि व्यवसायाच्या मार्गदर्शनापासून ते सामाजिक प्रबोधनापर्यंत नवीन पिढीपर्यंत विविध स्तरांवर कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हे काम करायचे आहे. काही कामे श्रमातून निर्माण होतात, काही कामे मार्गदर्शनातून निर्माण होतात. परंतु काही कामे आर्थिक ताकदीशिवाय उभी राहू शकत नाहीत आणि म्हणूनच अरुण नरके फौंडेशनला बळकट करण्याची गरज आहे. सामाजिक जाणीव अजूनही कायम आहे, सामाजिकतेची जाणीव अजूनही विविध प्रसंगांद्वारे जगात कुठेतरी सतत जागृत आहे. यासाठी अशा व्यक्ती / संस्थांचे आम्हास सहकार्य अपेक्षित आहे.

संस्था स्थापनेपासून आजपर्यंत समाजहिताचे अविरत कार्य चालू आहे आणि यापुढेही नवनवीन उपक्रमासह हे समाजकार्य अखंडित चालू राहील.