यशोगाथा

ANF अरुण नरके फौंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमधून तावून सुलाखून यशस्वी झालेल्या यशस्वी लोकांची यशोगाथा त्यांच्याच शब्दात!

विवेक पांडुरंग जाधव

जलसंधारण अधिकारी गट -ब


मी अरुण नरके फौंडेशनचे प्रथमतः खूप आभार, एक सामान्य मुलगा अधिकारी होऊ शकतो हा त्यांनी दिलेला विश्वास! प्रत्येक स्टाफ मेंबरने ज्या ज्या वेळी मदत लागेल तेव्हा खूप मदत केली, या प्रवासात आईवडीलांनी मोलाची साथ दिली. अपयशाने खचून न जाता त्यावर मात कशी करावी हे त्यांनी शिकवले.अरुण नरके फौंडेशनने दिलेला कानमंत्र म्हणजे,जेव्हा अपयश येते तेव्हा समजून जा, अजून तू ऐरण आहेस, घाव सोस ... आणि जेव्हा हातोडा होशील तेव्हा घाव घाल ! मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल अरुण नरके फौंडेशने खूप खूप आभार!

शशिकांत विलास माने

विक्रीकर निरीक्षक महाराष्ट्रात ६ वा


सर्वप्रथम मी अरुण नरके फौंडेशनचा आभारी आहे. कारण, जो चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. या उक्तीप्रमाणे अरुण नरके फौंडेशनच्या वृक्षरूपी सावली मध्ये मी घडलो या बद्दल मला सार्थ अभिमान वाटतो.

सत्यवान विलास शेंबडे

CISF


मी सत्यवान शेंबडे गाव-दिडवाघवाडी, (सातारा) या खेडे गावातून कोल्हापूरात शिक्षणासाठी आलो परंतू माझ्याकडे उदरनिर्वाह व शिक्षणाचा कोणताच मार्ग नव्हता. ज्यावेळी मी अरुण नरके फौंडेशन मध्ये आलो, त्यावेळी अरुण नरके साहेबांनी व सर्व स्टाफ ने मला मदत केली. शुन्यातून विश्व उभा करण्याची प्रेरणा अरुण नरके फौंडेशनमुळे मला लाभली. एखादयाला पुर्णपणे बदलण्याची ताकद अरुण नरके फौंडेशनमध्ये आहे. अरुण नरके फौंडेशन व नरके साहेबांचा मी सदैव ऋणी आहे.

राहुल हनुमंत निपसे

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी


माझ्या धावपळीच्या वेळेत उरलेला वेळ अभ्यासात खर्च करताना, सकाळ, दुपार व अगदी रात्री उशिरापर्यंत सुध्दा अरुण नरके फौंडेशनने माझ्यावर विश्वास दाखवला व स्टडीरूम व इतर अभ्यास साहित्य उपलब्ध करून दिले व माझा यशाचा प्रवास सुरू झाला. त्याबद्दल अरुण नरके फौंडेशन व स्टाफ, कर्मचारी, मार्गदर्शक यांचे आभार. तसेच वेळो वेळी श्री . अरुण नरके साहेबांनी प्रेरणा दिली,त्याबद्दल त्यांचे व्यक्तीशः आभार. हे यश माझे वैयक्तीक न मानता मी अरुण नरके फौंडेशनचे यश मानतो.

अक्षता धनंजय मुतालीक देसाई

बँक ऑफ इंडिया क्लार्क


खरंतर २०१४ ची IBPS Clerk ही परीक्षा मी दिलेली पहिलीच परीक्षा होती,पण मला अरुण नरके फौंडेशन कडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं. प्रत्येक विषयाची तयारी पक्की झाल्यामुळे,फक्त CWE चीच नाही तर Interview ची सुध्दा परफेक्ट तयारी झाल्यामुळे पहिल्याच प्रयत्नात मी यश मिळवू शकले. अरुण नरके फौंडशनने माझ्या करिअरचे फौंडेशन रचल्यामुळे पुढच्या टप्प्यांचा प्रवास सोपा झाला आहे.

अमर चौगले

पोस्टल असिस्टंट


मनोगत सुरू करण्यापूर्वी मी आवर्जून सांगेन की, मी कोणती IAS, IPS ची परीक्षा क्लिअर केली नाही, PSI,STI परीक्षा क्लिअर केली नाही. मात्र माझ्या कुटुंबाच्या मोडक्या संसाराला आधार देईन अशी पोस्ट तर नक्कीच मिळवली आहे. १ ली ते १० वी नेहमीच टॉपर राहील्याने घरच्यांच्या अपेक्षा माझ्याकडून जास्तच राहिल्या. मात्र ११वी, १२ वी च्या काळात हा टॉपर कुठे गायब झाला समजलेच नाही. १० वी ला ८२% मार्क्स मिळवणारा १२ वी ला ६२.६७% वर आला. डोळ्यासमोर काहीच ध्येय नसल्याने CET परीक्षा पण दिली नाही. मग कोणाच्या तरी सल्ल्याने डी. एड. केले, पण डी. एड. शेवटचा पेपर ज्या दिवशी होता त्याच दिवशी समजले की पुढची ५ वर्षे शिक्षक भरती होणार नाही. माझी, माझ्या घरच्यांची सगळी स्वप्न डोळ्यांसमोर धूसर होताना दिसत होती. मग विचार केला की, जे होऊन गेले त्यावर विचार न करता भविष्याचा विचार करावा. सुरक्षित नोकरी पाहिजे असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय पर्याय नाही असा विचार करून मी त्याचा अभ्यास सुरू केला,पण युद्ध जिंकायचे असेल तर सल्लागार, मार्गदर्शक पण त्याच योग्यतेचा निवडावा लागतो आणि माझ्या या युद्धात मला अरुण नरके फौंडेशनचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळाले. माझ्यासाठी अभ्यास करणे हे कधी चॅलेंज नाही राहिले पण माझ्यासाठी माझी परीस्थिती नेहमीच चॅलेंजिंग राहिली. माझ्या जवळ नेहमी प्रवासाएवढेच पैसे असायचे. कधी चहा, नाश्ता करण्याचे मन झालेच तरी मी नाही करायचो. मग या परीस्थितीत मी उपाय म्हणून खाजगी शिकवण्या, इंग्रजी शाळेत शिक्षक म्हणून काम करत मिळेल तेवढा वेळ अभ्यास करत राहिलो. वडील हमाली करायचे, आई मोलमजुरी करायची. त्यांची ही परीस्थीतीच मला नेहमी प्रेरणा देत राहिली. २०१४ मध्ये माझी निवड पोस्ट ऑफिस च्या परीक्षेत पोस्टल असिस्टंट म्हणून झाली पण हा संघर्ष इथेच संपला नाही. याच परीक्षेची स्किल टेस्ट तीन वेळेस घेतली गेली होती,या स्पर्धा परीक्षेच्या जीवनात अनेक चढ-उतार आले पण ध्येय नेमके असल्याने मी ते साध्य केले. मी माझ्या स्पर्धा परीक्षा जीवनात एक मोठी चूक केली, कदाचित ती परीस्थिमुळे असेल, की माझे अभ्यासात सातत्य राहायचे नाही, पण माझे मनोगत वाचणाऱ्या विद्यार्थ्यांनी तरी किमान ही चूक करू नये असे मला वाटते. पाण्याचा थेंब त्याच्या ताकदीमुळे नव्हे तर त्याच्या सातत्य मूळेच दगडाला भेदू शकतो. माझ्या या संघर्षातून एका जरी विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली व तो यशस्वी झाला तर मी माझ्या संघर्षाचे सार्थक झाले असे समजेन.पुन्हा एकदा अरुण नरके फौंडेशनचे आभार आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

भाग्यश्री बाळू कांबळे

PSI


२०१७ पासुन MPSC चा अभ्यास करायला सुरूवात केली आणि पहिलीच परीक्षा पास होऊन मी PSI झाले. प्रवास खडतर होता, पण अरुण नरके फौंडेशनच्या मदतीने तो पार करायला मदतच झाली. सर्व सरांनी खूप आत्मविश्वास दिला. मुलाखत उत्तमरीत्या घेतली. त्यामुळे याचा आयोगाच्या मुलाखतीवेळी चांगला उपयोग झाला. त्यामुळे मी सर्वांची ऋणी राहीन. धन्यवाद!

उर्मिला आबिटकर  

पोस्टल असिस्टंट


माझे मनोगत व्यक्त करण्यापूर्वी मी अरुण नरके फौंडेशनचे खूप आभार मानते कारण त्यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनामुळे आम्ही आमच्या कुटुंबांमधील चौघेपण सरकारी नोकरी करत आहोत. मी प्रथम म्हाडा ऑफिस मुंबईमध्ये फेब्रुवारी-२०१६ पासून लिपिक या पदावर कार्यरत होते. फेब्रुवारी -२०१८ मध्ये माझे पोस्टल सॉर्टींग असिस्टंट म्हणून सिलेक्शन झाले. यादरम्यान MPSC CLERK, पशुसंवर्धन विभाग परीचर, या परीक्षेतही यश मिळाले. मी डिसेंबर २०१४ मध्ये अरुण नरके फौंडेशनला प्रवेश घेतला फौंडेशनमध्ये शिक्षकांची शिकवण्याची पद्धत, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देणे तसेच गणित व बुद्धिमत्ता वरील प्रश्न सोडवण्याच्या ट्रिक्स, इंग्रजी विषयावरील दिले जाणारे सखोल तसेच बेसिक नॉलेज, आठवड्यातून घेतल्या जाणाऱ्या टेस्ट तसेच घरी सोडण्यासाठी दिले जाणारे गणिताचे प्रश्न असा सतत सराव घेतल्यामुळे विषय पक्के होण्यास मदत झाली. अभ्यासिकेची सोय, फौंडेशनमध्ये शिकवत असणाऱ्या सरांच्या अनमोल अशा मार्गदर्शनामुळे मी हे यश मिळवू शकले. तसेच घरातील सासू सासरे व माझे मिस्टर यांचा मला स्पर्धा परीक्षा देण्यासाठी खूप मोलाचा पाठिंबा आहे. अरुण नरके फौंडेशनचे खूप आभार आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा ...

प्रियांका रंगराव तावडे

BOI Clerk


माझ्या आईवडीलांचा पाठिंबा, भावाची सोबत आणि अरुण नरके फौंडेशनचं मोलाचं असं मार्गदर्शन यामुळेच मी माझ्या या यशाला गवसणी घालू शकले. यासाठी बरोबर दोन वर्षाचं माझं अथक परीश्रम अरुण नरके फौंडेशनच्या सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाची खुप मदत झाली आणि त्यामुळेच बरोबर दीड वर्षाच्या अभ्यासातुन दोन पोस्ट काढू शकले. मला मिळालेल्या मोलाच्या अशा मार्गदर्शनाबद्दल मी शतशः ऋणी आहे. धन्यवाद!

नरहरी रघुनाथ पाटील (माजी सैनिक)

पाच शासकीय पदांवर निवड


१९ वर्षे देशसेवा करून मी सेवानिवृत्त झाल्यानंतर अरुण नरके फौंडेशनमध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रवेश घेतला माझे वय ४२ वर्ष असून त्यात १९ वर्षे देशसेवा करून MPSC च्या माध्यमातून यश मिळवणे हे माझ्यासाठी चॅलेंज होते. अरुण नरके फौंडेशनमध्ये प्रवेश घेतल्यानंतर सर्व स्टाफ ने जो मला आत्मविश्वास दिला त्यामुळे ९ महिन्याच्या स्पर्धा परीक्षेतील परिश्रमानंतर आज मला ५ पोस्ट मिळाल्या. त्यामध्ये मंत्रालय लिपिक, कर सहाय्यक, MSRTC क्लार्क, CID मधील फिंगरप्रिंट व हँड रायटिंग एक्सपर्ट अशा ५ पोस्ट मिळवू शकलो. २०-२५ वर्षे मी MPSC च्या अभ्यासक्रमापासून दूर होतो आणि या वयात नवीन उमेदीने अभ्यास करण्यास उत्साह, आत्मविश्वास प्रेरणा दिली अशा अरुण नरके फौंडेशनच्या सर्व स्टाफचे मी आभार मानतो.

रजनीगंधा येळापुरे

विजया बँक, क्लार्क


मला दहावी नंतर दृष्टीमध्ये दोष आला,त्यामुळे माझे सर्व शिक्षण राईटर व ऑडिओ सीडीच्या माध्यमातून झाले आहे. माझे शिक्षण एम.ए. हिंदी त्याचबरोबर मी नेट व सेट सुद्धा पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असताना मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. अरुण नरके फौंडेशनमध्ये मी प्रवेश घेतला आणि दोन महिन्यांमध्येच माझी विजया बँक क्लार्क पदी निवड झाली. अरुण नरके फौंडेशनमधून मला खूप सहकार्य मिळाले. मी कुठेतरी कमी आहे याची जाणीव त्यांनी करून दिली नाही. माझ्या वेळेनुसार त्यांनी सहकार्य केले. माझ्या यशात अरुण नरके फौंडेशनचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. समाजामध्ये माझ्यासारखी अंध अपंग मूकबधिर मुले आहेत अशा मुलांना सहकार्य करून पुढे न्या धन्यवाद!

वर्षाराणी पाटील

बँक ऑफ इंडिया, क्लार्क


बँकिंग चा अभ्यास करताना मला अरुण नरके फौंडेशनमधील सर्व स्टाफ ने खूप मदत केली वेळोवेळी बँकिंग टर्म आणि बेसिक कन्सेप्ट क्लिअर केल्या. स्टडीरूम मधील वातावरणामुळे अभ्यासात उत्साह निर्माण झाला आणि त्यामुळे मी फायनल सिलेक्शन पर्यंत पोहोचू शकले.

प्रणाली संजय पाटील

लिपिक महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ


सर्वप्रथम मी अरुण नरके फौंडेशनचे मनापासून आभार मानते. मी अरुण नरके फौंडेशनमध्ये २०१७ ला बँकिंगची IBPS P.O. च्या बॅचला अॅडमिशन घेतल होते. या क्लासचा मला खूप फायदा झाला. येथील शिक्षक व शिक्षकेत्तर स्टाफने मला येथे शिक्षण घेण्यात तसेच Study Room मध्ये Study करण्यात खूपच मदत केली. त्यामुळे मी इथे खूप Comfortable Study करू शकले. तसेच आज जे यश मला मिळाले त्यात माझ्या आई-वडीलांच्या सोबतच अरुण नरके फौंडेशनचाही मोलाचा वाटा आहे. शेवटची फक्त एवढच म्हणेन Thank you so much for everything.

अमोल जगन्नाथ पाटील

PSI


स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यासाबरोबर मुलाखतीची तयारी महत्वाची असते, त्याची परिपूर्ण तयारी अरुण नरके फौंडेशनमध्ये करून घेण्यात आली. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. अरुण नरके फौंडेशन अभ्यासासाठी परिपूर्ण असे फौंडेशन आहे. तरी विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग करिअर घडवण्यासाठी करावा.

दीपक आनंदा माने

PSI


माझ्या MPSC च्या वाटचालीमध्ये अरुण नरके फौंडेशनचा मोलाचा वाटा आहे, विशेषतः गरीब कुटुंबातील मुलांना माफक फी मध्ये योग्य मार्गदर्शन देण्याचे काम फौंडेशन करत आहे. त्या बद्दल विशेष आभार, विशेष म्हणजे अधिकाऱ्यांकडून आमच्या मुलाखती झाल्या व त्याचा मला जास्त फायदा झाला.

रामलिंग सूर्यवंशी

Excise PSI


अरुण नरके फौंडेशनचे प्राध्यापक वृंद खरंच खूप मेहनतीने प्रत्येक विद्यार्थ्याकडून स्पर्धापरीक्षेची तयारी करून घेतात. तसेच फौंडेशनने माफक दरामध्ये चालू केलेल्या ओजस निकेतन लायब्ररीत मला खूप फायदा झाला. माझ्या यशामध्ये फौंडेशनचा वाटा अमूल्य आहे.

सोनी सदाशिव शेट्टी (PSI) राज्यात ३ री


आज मी अधिकारी पदापर्यंत पोहोचले ते फक्त अरुण नरके फौंडेशनमुळेच! स्पर्धा परीक्षेतील अडचणीवर मात करताना मी संयम राखून ठेवला. मला आत्मविश्वास देण्याचं अपयशातून पुन्हा जोमाने उठून स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रेरीत केले. माझे अरुण नरके फौंडेशनमधील गुरु आणि स्टाफ यांचे मनःपूर्वक आभार!

सौ. राणीताई शिवाजीराव पाटील (अधिव्याख्याता DIET)


आम्हा शेतकऱ्यांच्या मुलींना अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करण्यामध्ये अरुण नरके फौंडेशनने सिंहाचा वाटा उचलला आहे, फौंडेशनचे शतशः आभार. अधिकारी होण्याचे स्वप्न कोणत्याही वयात साकार होऊ शकते ते फौंडेशनमध्ये आल्यानंतर कळाले व मेहनत करण्याचे बळ मिळाले अरुण नरके फौंडेशनच्या सहकार्यास अभिनंदन!

सुरज उदय पाटील Specialist officer (Agriculture field officer)


सुरज उदय पाटील Specialist officer (Agriculture field officer) BOI माझा हा पहिलाच प्रयत्न होता. आई-वडीलांचा आशिर्वाद अथक परीश्रम आणि नियोजनरीत्या अभ्यास ही यशाची त्रिसुत्री अरुण नरके फौंडेशनच्या माध्यमातुन गवसली. मुलाखतीसाठी विशेष सहकार्य केल्यामुळे हे यश खुपच सोप्पे झाले. मला लाभलेल्या या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल मी अरूण नरके फौंडेशनचा शतशः ऋणी आहे. धन्यवाद!

उदय पाटील पी.एस.आय.(राज्यात दुसरा)


माझ्या यशामध्ये अरूण नरके फौंडेशनचे खूप सहकार्य लाभले. वैयक्तिक प्रशिक्षण झाले. मुलाखती सरावासाठी दरवेळी वेगवेगळे पोलीस प्रशासनातील अधिकारी होते. त्यातून खूप काही शिकायला मिळाले त्यामुळेच PSI पदी राज्यात दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली.

सुधीर सुभाष पाटील (उपजिल्हाधिकारी)- राज्यात दुसरा क्रमांक


जून २०१५ पासून राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू होती. अरुण नरके फौंडेशनमध्ये यावेळी प्रवेश घेतला. याचा मला खूप उपयोग झाला. योग्य प्रकारे पूर्वतयारी करून नियोजन बध्द वाटचाल केल्यास आणि त्याला भरपूर सरावाची जोड दिल्यास, कमीत कमी वेळात मोठे यश मिळू शकते. फक्त प्रयत्न करण्याची गरज आहे. ‘ वक्त भी झूक जायेगा, तू कदम तो बढा कर देख... सफलता मिलकर रहेगी, तू एक जुनून जगा के तो देख! ’

उदयसिंह पांडुरंग सरनाईक (गटविकास अधिकारी शाहुवाडी)


स्पर्धा परीक्षांची तयारी अरुण नरके फौंडेशनमध्ये केली. माझ्या यशात अरुण नरके फौंडेशनचा खूप मोठा वाटा आहे विशेष म्हणजे फौंडेशनचे ग्रंथालय आणि अभ्यासिका यांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला. मी जे गटशिक्षण अधिकारी पद म्हणून कार्यरत आहे ते शंभर टक्के अरुण नरके फौंडेशन मुळेच!

शिवराज बंडोपंत नाईकवडे (अधिक्षक, धर्मादाय सहआयुक्त कार्यालय कोल्हापूर)


ज्या काळात स्पर्धा परीक्षांची काही माहिती नव्हती. त्याकाळात अरुण नरके फौंडेशनने मोठ्या प्रमाणात पुस्तके उपलब्ध करून दिली. सुरुवातीला जेव्हा मार्गदर्शनाची आवश्यकता होती तेव्हा अरुण नरके फौंडेशनमध्ये बेसिक पक्के करण्यासाठी मदत झाली. इथूनच पाया मजबूत झाल्यामुळे आम्ही या पदापर्यंत पोहोचू शकलो.

वैशाली काशीद (राज्यकर उपायुक्त, कोल्हापूर)


आज मला या खुर्चीवर जो मान रुबाब ऐश्वर्य जे मिळाले ते अरुण नरके फौंडेशनमुळे! ज्या ज्या वेळेला जे जे लागेल ते विद्यार्थ्यांना पुरवण्याचे काम अरुण नरके फौंडेशनने केले, मला अभिमान आहे. मी अरुण नरके फौंडेशनची पहिली विद्यार्थिनी क्लासवन अधिकारी झाले आहे.

सतीश शिदे API (LCB)


इचलकरंजी ग्रामीण भागातील तरुणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न मला फौंडेशनमुळे पूर्ण करता आले. मी स्वतः अधिकारी झालो त्याचे पूर्ण श्रेय फौंडेशनचे आहे. विद्यार्थ्यांना सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, उत्तम मार्गदर्शन अत्यंत माफक फी ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम अरुण नरके फौंडेशन करत आहे.

शर्मिला मिस्कीन (राज्यकर उपायुक्त, सांगली)


अरुण नरके फौंडेशनमध्ये अभ्यासाला पोषक वातावरण होते. त्यामुळे सगळे घडत गेले. आज मला शासकीय सेवा करण्याचे भाग्य मिळाले ते अरुण नरके फौंडेशन मुळेच!

सुशांत सुरेश माळवी (कनिष्ठ लेखापरीक्षक आणि लेखालिपीक)


अरुण नरके फौंडेशनमध्ये अभ्यासाला पोषक वातावरण होते. त्यामुळे सगळे घडत गेले. आज मला शासकीय सेवा करण्याचे भाग्य मिळाले ते अरुण नरके फौंडेशन मुळेच!

संदीप कुडलीक सावंत (मुंबई उच्च न्यायालय, शिपाई)

'आमशी, कोल्हापूर.


सर्वप्रथम अरुण नरके फौंडेशनचे आभार मानतो. माझ्या आईवडीलाप्रमाणेच मला घडविण्यात अरुण नरके फौंडेशनचा खूप मोठा वाटा आहे. फौंडेशनमधील शिक्षकांकडून मला मिळालेले योग्य मार्गदर्शन यामुळे मी यशाला गवसणी घालू शकलो त्याबद्दल मी अरुण नरके फौंडेशनचे मनापासून आभार मानतो.

श्री.शितलकुमार अनिल डोईजड

PSI (गडचिरोली)


गडचिरोलीमध्ये सलग ३ वर्षे PSI म्हणून सेवा केली. गडचिरोलीहा जिल्हा नक्षलप्रभावी असल्याने , तिथे केलेल्या कामगिरीमुळे मला पोलिस महासंचालक व राष्ट्रपती शौर्य पदक मिळाले. हे यश मला PSI म्हणून निवड झाल्यानेच मिळाले , त्यामुळे मी अरुण नरके फौंडेशनचा खूप आभारी आहे..  

रेश्मा मधुकर पोटे

नोंदणी कार्यालय क्लार्क - कोल्हापूर


सरकारी नोकरीचे स्वप्न पाहण्याचे धाडस आणि ते सत्यात आणण्याचे काम फक्त अरुण नरके फौंडेशनमुळेच शक्य झाले. केवळ फौंडेशनमुळेच आज मी सन्मानाने जगू शकते.फौंडेशनचे अचूक मार्गदर्शन , टेस्ट सिरीज आणि माझा आत्मविश्वास यामुळेच मला हे यश संपादन करता आले. ग्रामीण भागातील मुलांसाठी तर हि संस्था दिपस्तंभासारखी आहे.

उत्तम पाटील.

कृषी सेवक


ज्यावेळेस प्रवेश घेतला त्यावेळी स्पर्धा परीक्षेचा कोणताही अनुभव नव्हता मात्र अरुण नरके फौंडेशनचे क्लास लेक्चर व सराव टेस्टमुळे नेमका कोणता अभ्यास करावा याची माहिती मिळाली.फौंडेशनचा सर्व स्टाफ, स्टडी रूम, शिक्षक, व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची मोलाची साथ व मार्गदर्शन मिळाले.

रणजित महादेव पाटील (माझी सैनिक)

पुणे पोलीस


नोकरी आणि सपर्धा परीक्षा यांचा काहीही माहिती नसताना, मी या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात येण्याचे ठरविले.कशी सुरवात करावी हेच काळत नव्हते.पण सुरवात करून दिली अरुण नरके फौंडेशन गडहिंग्लज शाखेने आणि तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाने माझी पहिल्याच प्रयत्नात पोलीस मध्ये निवड झाली.  

प्रमोद पाटील

PSI


घरची परिस्तिथी नसताना पण मी जॉब करत स्टडी केला.जस माझ्या कुटूंबाने मला आत्तापर्यंत मदत केली तस अरुण नरके फौंडेशन हे माझं दुसरं कुटूंब होत.या कुटूंबातील प्रत्येक सदस्याने मला मदत केली आहे.त्यामुळेच मी या पदापर्यंत पोहचलो.